*त्रिपुरारी पौर्णिमा यात्रा २०२६* नमस्कार, समर्थ टूर्स अँड ट्रॅव्हल्स - बदलापूर मध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे. यंदाच्या साल २०२६ च्या त्रिपुरारी यात्रेच्या निमित्ताने आम्ही दिनांक "२० ते २४ नोव्हेंबर" दरम्यान ग्रुप यात्रेचे आयोजन करत आहोत. ज्या भाविकांना या यात्रेत सहभागी व्हायचे आहे त्यांनी आपल्या नावाची नोंदणी आमच्याकडे करून घ्यावी. ग्रुप यात्रा असल्यामुळे मर्यादित नोंदणी करून घेतली जाईल. नोंदणी जूलै च्या पहिल्या आठवड्यापासून स्वीकारली जाईल. *यात्रेचा तपशील पुढील प्रमाणे:* *दिवस पहिला (२० नोव्हेंबर):* दादर स्थानकावरून सकाळी ९:३० वाजता ट्रेन क्रमांक १९०१५ सौराष्ट्र एक्सप्रेस ने राजकोट कडे रवाना. *दिवस दुसरा (२१ नोव्हेंबर):* • पहाटे ०१:३० पर्यंत राजकोटला पोहोचणार, तिथून जुनागढ चा प्रवास आपल्या ठरलेल्या बस ने असेल. *(परिक्रमेला जुनागढ पर्यंत थेट तिकिटे उपलब्ध होत नसल्याने हा पर्याय आम्ही निवडतो)* • पहाटे ६ पर्यंत जुनागढ स्थित हॅाटेल कडे पोहोचणार, • रात्री गिरनार प्रदक्षिणा करिता रवाना, *दिवस तिसरा (२२ नोव्हेंबर):* • सकाळी प्रदक्षिणा करून हॅाटेलकडे परतणार, • रात्री उशिरा गिरनार (गुरुशिखर) चढाईला सुरूवात, *दिवस चॊथा (२३ नोव्हेंबर):* • सकाळी गुरुशिखर उतरल्यावर पूर्ण दिवस आराम *दिवस पाचवा (२४ नोव्हेंबर):* • दुपारी ०३:५० वाजता ठरलेल्या बस ने राजकोट कडे रवाना. रात्री ०९:२५ वाजता ट्रेन क्रमांक २२९२४ BDTS हमसफर एक्सप्रेस ने मुंबई च्या दिशेने रवाना. *दिवस सहावा (२५ नोव्हेंबर):* सकाळी ०९:३० पर्यंत बांद्रा टर्मिनस - मुंबई ला सगळे पोहोचणार. इथे यात्रा समाप्त होते. *काही मार्गदर्शक सूचना -* * ट्रेन प्रवासाला निघण्यापूर्वी नियोजित स्थळी वेळेच्या तासभर आधी पोहोचण्याची काळजी घ्यावी. * व्यवस्थापकाच्या संपर्कात रहावे, * यात्रेकरूंना यात्रेच्या आधी त्यांची तिकिटे व्हॉट्सअँप द्वारे पाठवली जातील, त्याची एक कॉपी आणि सोबत आपले ओळखपत्र (पॅनकार्ड/आधारकार्ड) सोबत ठेवावे. तिकीट व्यवस्थापकाने मागणी केल्यास ओळखपत्र दाखवणे बंधनकारक असेल. * आपल्या तिकिटाप्रमाणे आसने दिलेली असतील त्याप्रमाणे बसावे, कुणालाही आपल्या सोयीनुसार सीट्स मिळत नाहीत आणि ते आयोजकांच्या हातात नसते. जर तशी गरज भासल्यास संबंधित प्रवाशाने सहप्रवाश्यास विनंती करून सोयीनुसार जागा उपलब्ध करून घ्यावी, आयोजकांकडून उपलब्ध करून दिली जाणार नाही. * यात्रेला निघण्यापूर्वी सर्वांनी आपले सामान तथा प्रवासात लागणारे साहित्य, खाद्यपदार्थ सोबत घेणे. ज्यांना औषधे चालू आहेत त्यांनी ती सोबत घ्यावी. सोबत स्वेटर, कानटोपी घेणे. थंडीचे दिवस असल्याने त्याचा उपयोग होऊ शकतो. कुणाला काही व्याधी असल्यास त्याची पूर्वकल्पना आयोजकाला द्यावी. * रेल्वे प्रवासात खाण्यापिण्याची व्यवस्था स्वतः करावी लागेल. * रेल्वे प्रवासात शक्यतो बाहेरील पदार्थ खाणे टाळावे कारण त्याची गुणवत्ता आणि क्वालिटी किती योग्य असेल याची खात्री नाही. म्हणून प्रवासात घरचा खाऊ सोबत ठेवावा. * सर्वांना खाण्यासाठी कूपन देण्यात येतील, आयोजन केलेल्या ठिकाणी जेवणाची व्यवस्था केलेली असते त्या ठिकाणी कूपन देऊन जेवण / नाष्टा करून घ्यावा. * नाष्टा आणि जेवणाच्या वेळा ठरलेल्या असतात, कृपया त्याप्रमाणे नियोजन करावे. * ज्यांचा उपवास असेल त्यांनी सोबत फळे अथवा उपवासाचा फराळ सोबत ठेवावा. * उपवासाचे आम्ही नियोजन करत नाही आणि पॅकेज मधे त्याकरिता वेगळी सवलत मिळत नाही. * स्वतःच्या मौल्यवान वस्तूंची काळजी स्वतः घ्यावी, हरवल्यास आयोजक जबाबदार राहणार नाही. * हॉटेलचे नॉन AC रूम हे ५ जणांच्या शेअरिंग बेसवर दिले जाईल. * महिलाना आणि पुरुषांना रूम वेगळी असेल, जर ५ जणांची फॅमिली असेल तर त्यांना एक रूम दिली जाईल. * जुनागड ला पोहोचल्यावर पहिल्या रात्री प्रदक्षिणेकरिता निघणार, यात्रेला येणाऱ्या भाविकांनी समर्थ टुर्स च्या ग्रुप सोबत यायचे असल्यास येऊ शकतात अथवा ज्याला जसे जमेल त्याने त्याच्या सोयीप्रमाणे प्रदक्षिणेकरिता ग्रुप ने जाऊ शकतात. * प्रदक्षिणा पूर्ण करून सकाळी पुन्हा आपल्या रूम वर येऊन नेहमीचा नित्यक्रम आवरून घावा. * जेवण करून पूर्ण दिवस आराम करावा. * दुसऱ्या दिवशी रात्री गिरीशिखर चढाईला सुरुवात करायची. * चढताना सोबत जाड पाण्याच्या बाटल्या घ्याव्या. पर्यावरणाला हानी होईल अशा बाटल्या तथा पिशव्या तेथे एन्ट्री पॅाईंटवर काढून घेतल्या जातात. * आमच्याकडे रबर बाटली उपलब्ध असते, ज्यांना हव्या असतील ते विकत घेऊ शकतात, (पूर्ण जुनागढ मध्ये प्लास्टिक बंदी आहे) याची खबरदारी घ्यावी. * सोबत लिंबाच्या गोळ्या, ORS, आणि हलका खाऊ घ्यावा. सोबत पाणी जेवढ्या जास्त प्रमाणात घेता येईल तेवढे आवर्जुन घ्यावे कारण रात्री वर कुठल्याही प्रकारे पिण्याच्या पाण्याची सोय नाहीये. * सोबत टॅार्च लाईट घ्याव्यात. आणि सोईनुसार पायात चपला अथवा बुट घालावेत, कारण अनवाणी पायाने गुरुशिखर चढणे धोकादायक असते. * तसेच गुरुशिखर चढणार्या व्यक्तीने रात्रीच्या जेवणात हलका आहार घ्यावा कारण गुरुशिखरावर कुठल्याही प्रकारच्या नॆसर्गिक विधीची सोय नाहीये. * ज्याला रोप-वे ने गुरुशिखरला जायचे आहे त्यांनी दुसर्या दिवशी सकाळी ७ वाजता रोप-वे चालू होतो त्यानुसार नियोजन करावे. (आम्ही रोप-वे चे नियोजन करत नाही) * गुरूशिखर चढताना भरपूर गर्दी असते, स्वतःची तब्येत जपून प्रवास करावा. * तिसऱ्या दिवशी गुरुशिखर वर पवित्र दत्त पादुकांचे दर्शन करून झाल्यावर शेजारीच असलेल्या कमंडलू स्थित प्रसादालयात प्रसाद घ्यावा आणि परतीच्या प्रवासाला निघावे. * गुरूशिखर उतरल्यावर रूम वर जावे, नेहमीचा नित्यक्रम आवरून आणि जेवण करून पूर्ण दिवस आराम करावा. * चौथ्या दिवशी दुपारी ३:३० वाजता ठरलेल्या बस ने राजकोट स्थानकाकडे रवाना. * रात्रीचे जेवण करून मग ९:३० वाजता ट्रेन ने मुंबई कडे रवाना. *अटी* * आयोजकांकडून जेवणाची जिथे सोय केली असेल तिथेच जेवण करता येईल. * जेवणाचा जो मेनू असेल त्याव्यतिरिक्त वेगळी सोय नसेल. * जेवणाच्या आणि नाष्टा च्या ठराविक वेळा असतात त्या वेळेतच करणे बंधनकारक असेल. * जेवण हे केवळ शाकाहारी असेल. * तसेच रेल्वे प्रवासातील जेवण आयोजकांकडून दिले जात नाही. * रूम ५ जणांमध्ये शेअरिंग बेस ने असेल. * बस प्रवासात महिलांना पुढील सीट दिल्या जातील. * आयोजकाने दिलेल्या नियमांचे पालन करणे बंधनकारक असेल, * आयोजकासोबत वाद घालू नये, तसे केल्यास सदर यात्रेकरूला ग्रुप मधून बाद केले जाईल. * सदर यात्रा नेहमीप्रमाणे सोईस्कर असेलच असे नाही, त्रिपुरारी यात्रेला देशाच्या कानाकोपऱ्यातून भरपूर प्रमाणात यात्रेकरू तेथे येत असल्याने त्यावेळेस थोडीफार गैरसोय होऊ शकते, त्यामुळे सर्वांकडून सहकार्याची अपेक्षा. * यात्रेचा खर्च (स्लीपर कोच ₹12500/- आणि 3AC कोच ₹13500/-) असेल. * यात्रेची बुकिंग करण्यासाठी रक्कम ₹९५००/- आधी भरणे बंधनकारक असेल. * यात्रा कुठल्याही कारणास्तव रद्द केल्यास बुकिंग रक्कम कुठल्याही परिस्थितीत परत केली जाणार नाही. अथवा त्याच्या बदली प्रवासी घेतला जाणार नाही. * रेल्वेची तिकिटे पाठवल्यानंतर व्यवस्थित तपासून घ्यावीत, काही त्रुटी असल्यास लगेच कळवावे. * अंतिम निर्णय हा आयोजकाचा राहिल. * यात्रेदरम्यान सर्व नियमांचे व अटिंचे पालन करणे बंधनकारक असेल. * आयोजकांचा मोबाईल नंबर यात्रेदरम्यान आपल्या मोबाईल मध्ये सेव करून ठेवावा. 9152091078/7710863217
गिरनार (गुरुशिखर) - सोमनाथ ज्योतिर्लिंग यात्रा *दिवस पहिला* १) आपली यात्रा शनिवारी बांद्रा टर्मिनल्स येथून ट्रेन क्रमांक १९२०३ BDTS Vrl एक्सप्रेस ने सुरू होईल ट्रेन ची वेळ संध्याकाळी ०७:२५ वाजता आहे, पण सर्वांना विनंती आहे कि वेळेच्या २ तास आधी बांद्रा टर्मिनल्स वर पोहोचण्याची काळजी घ्यावी, यादरम्यान आयोजकाच्या संपर्कात रहावे, येथे सर्व यात्रेकरूंना आपापली उपस्थिती दर्शवून त्यांची आसने दाखवण्यासाठी मदत होईल. आपल्या तिकिटाप्रमाणे आसने दिलेली असतील त्याप्रमाणे बसावे, कुणालाही आपल्या सोईनुसार सिट्स मिळत नाहीत आणि ते आयोजकाच्या हातात नसते, जर तशी गरज भासल्यास संबंधित प्रवाशाने सहप्रवासी असेल त्यास विनंती करून सोयीनुसार जागा करून घ्यावी. आयोजकाकडुन उपलब्ध करून दिली जाणार नाही. २) यात्रेला निघण्यापूर्वी सर्वानी आपले सामान तथा प्रवासात लागणारे साहित्य, खादयपदार्थ सोबत घेणे, ज्यांना ओषधे चालू आहेत त्यांनी ती सोबत घेणे, सोबत स्वेटर अथवा कानटोपी घेणे, वर थंडी असल्याने त्याचा उपयोग होऊ शकतो, कोणाला काही व्याधी अथवा काही त्रास असल्यास कृपया आम्हाला याची पूर्वकल्पना द्यावी. ३) *रेल्वे प्रवासात आणि बस प्रवासात प्रत्येकाला आपल्या खाण्यापिण्याची व्यवस्था स्वतः करावी लागेल*. ४) रेल्वे प्रवास संपल्यानंतर सर्व यात्रेकरूंना जेवणाच्या कुपन्स दिल्या जातील. ज्यांचा उपवास असेल त्यांनी सोबत फळे अथवा उपवासाचा फराळ सोबत ठेवावा, उपवासाचे आम्ही नियोजन करत नाही आणि पॅकेज मध्ये त्याकरिता वेगळी सवलत मिळत नाही. ५) स्वतःच्या मौल्यवान वस्तूची काळजी स्वतः घ्यावी, हरवल्यास आयोजक जबाबदार राहणार नाही. *दिवस दुसरा* १) रविवारी साधारणपणे सकाळी १०:३० ते ११:०० पर्यंत आपण जुनागढ स्थानकावर पोहोचणार. तेथून मग रिक्षा ने हॉटेलकडे रवाना होणार. साधारणपणे ११:३० वाजेपर्यंत हॉटेल वर आपण पोहोचणार. २) ठरल्याप्रमाणे हॅाटेलचे रुम दिले जातील. (शेअरींग किमान ४ ते ५ व्यक्ती) *(वेगळी रुम हवी असल्यास त्याचे अधीकचे चार्जेस द्यावे लागतील.)* ३) फ्रेश होऊन दुपारी १२ वाजेपर्यंत जवळच्या आयोजीत केलेल्या ठिकाणीच जेवणाकरीता जायचे आहे. जेवण करून मग त्यादिवशी दुपारी १ वाजेपर्यंत बस / कारने भालकातीर्थ, गीता मंदिर आणि सोरटी सोमनाथ दर्शना करिता निघणार आहोत (हा साधारण ९८ किलोमीटर चा प्रवास आहे) ४) रात्री ८-९ पर्यंत गिरनार ला हॅाटेलवर पोहचणार, रात्रीचे जेवण करून आपापल्या रूमवर जाणार. ५) याच दिवशी ज्यांना पायी गुरुशिखर चढायचे आहे त्यांनी रात्री १२:३० वाजता चढायला सुरूवात करावी कारण रात्रीचे वातावरण थंड असल्याने चढणे सोईस्कर असते, चढताना सोबत जाड पाण्याच्या बाटल्या घ्याव्या. पर्यावरणाला हानी होईल अशा बाटल्या तथा पिशव्या तेथे एन्ट्री पॅाईंटवर काढून घेतल्या जातात. आमच्याकडे रबर बाटली उपलब्ध असते, ज्यांना हव्या असतील ते विकत घेऊ शकतात, (पूर्ण जुनागढ मध्ये प्लास्टिक बंदी आहे) याची खबरदारी घ्यावी. सोबत लिंबाच्या गोळ्या, ORS, आणि हलका खाऊ घ्यावा. सोबत पाणी जेवढ्या जास्त प्रमाणात घेता येईल तेवढे आवर्जुन घ्यावे कारण रात्री वर कुठल्याही प्रकारे पिण्याच्या पाण्याची सोय नाहीये. सोबत टॅार्च लाईट घ्याव्यात. आणि सोईनुसार पायात चपला अथवा बुट घालावेत, कारण अनवाणी पायाने गुरुशिखर चढणे धोकादायक असते. ६) तसेच गुरुशिखर चढणार्या व्यक्तीने रात्रीच्या जेवणात हलका आहार घ्यावा कारण गुरुशिखरावर कुठल्याही प्रकारच्या नॆसर्गिक विधीची सोय नाहीये. ७) ज्याला रोप-वे ने गुरुशिखरला जायचे आहे त्यांनी दुसर्या दिवशी सकाळी ७ वाजता रोप-वे चालू होतो त्यानुसार नियोजन करावे. (आम्ही रोप-वे चे नियोजन करत नाही) *दिवस तिसरा:* १) सोमवारी पायी गुरुशिखर चढून गेल्यावर पहाटे ४ त ५ वाजेपर्यंत दत्तस्थानावर पोहोचता येते. २) सकाळी ६ वाजता मंदिर उघडल्यावर दर्शन घेऊन मग खाली उतरण्यास सुरूवात करायची. ३) जवळच असलेल्या प्रसादालयात (कमंडलू) प्रसाद घेउन, दत्त धुनी पाहून मग गुरुशिखरावरुन परतीचा प्रवास करायचा आहे. ४) आंबामाता मंदिरापर्यंत पोहोचल्यावर परतीसाठी ज्यांना रोप-वे ने खाली उतरायचे असल्यास तसा पर्याय आहे. त्याचे तिकिट दर ४००/- प्रती व्यक्ती आहे, आणि ज्यांना पायी गुरुशिखर उतरायचे आहे ते पायी उतरु शकतात. ५) रूमवर परतल्यानंतर ज्यांना जेवण करायचे आहे त्यांनी जेवण करून शक्यतो आराम करावा. *(गुरूशिखर ला पोहोचल्यावर दुसर्या दिवशी दुपारचे आणि रात्रीचे जेवण आणि संध्याकाळचा चहा असेल)* त्या दिवशी आंघोळ न करण्याची आख्यायिका आहे, पण ते ऎच्छिक आहे. *दिवस चॊथा* १) रूमवर आराम करून संध्याकाळी ज्यांना जवळपास फिरायचे असल्यास ते फिरुन येऊ शकतात. तसेच स्थानिक पर्यटन स्थळे व मंदिरेही आहेत ते फिरण्यासाठी रिक्षा असतात, ज्यांना फिरायची ईच्छा असेल त्यांनी स्वखर्चाने फिरुन येऊ शकतात. रात्री तिथेच हॅाटेलवर मुक्काम असेल. *दिवस पाचवा* १) मंगळवारी सकाळी ठरलेल्या ठिकाणी नाष्टा करून, तसेच दुपारी ११ वाजता जेवण करून साधारण दुपारी १२:०० वाजता रिक्षा ने जुनागढ स्थानकाकडे रवाना. २) दुपारी १३:१० च्या ट्रेन क्रमांक १९२१८ BDTS सौराष्ट्र जनता एक्सप्रेस ने मुंबई कडे रवाना. *दिवस सहावा* १) बुधवारी सकाळी ०४: ४५ ला सगळे बांन्द्रा टर्मिनल्स ला पोहोचणार. येथे आपली यात्रा समाप्त 🙏 *काही महत्वाच्या टिप:* यात काही बदल झाल्यास आयोजकाकडुन कळवण्यात येईल. रुम किमान ४ ते ५ जणांना शेअरींग बेस ने असेल. त्याव्यतिरिक्त वेगळी रुम हवी असल्यास अधिकचे चार्जेस द्यावे लागतील. बस प्रवासात महिलांना पुढील सिट्स दिल्या जातील. जेवणाचा जो मेनु असेल त्याव्यतिरिक्त वेगळी व्यवस्था नसेल. चहा नाष्टा सकाळी ८ ते ९ यावेळेसच उपलब्ध असेल.*(एक वेळ मर्यादित)* जेवणाची दुपारची वेळ ११:३० ते २ असेल आणि रात्रीच्या जेवणाची वेळ ७:३० ते १० असेल. *(अमर्यादित)* बुकिंग करिता रक्कम ₹५५००/- आधी भरणे बंधनकारक असेल. यात्रा रद्द केल्यास बुकिंग रक्कम कुठल्याही परिस्थितीत परत केली जाणार नाही. अथवा त्याच्या बदली प्रवासी घेतला जाणार नाही. रेल्वेची तिकिटे पाठवल्यानंतर व्यवस्थित तपासून घ्यावीत, काही त्रुटी असल्यास लगेच कळवावे. अंतिम निर्णय हा आयोजकाचा राहिल. यात्रेदरम्यान सर्व नियमांचे व अटिंचे पालन करणे बंधनकारक असेल. माझा मोबाईल नंबर यात्रेदरम्यान आपल्या मोबाईल मधे सेव करून ठेवावा. 9152091078/7710863217
द्वारका - नागेश्वर - सोमनाथ (ज्योतिर्लिंग) गिरनार यात्रा *दिवस पहिला* आपली यात्रा शुक्रवारी रात्री ८:०५ मिनिटांनी मुंबई सेंट्रल येथून ट्रेन क्रमांक २२९४५ सॊराष्ट्र मेल एक्सप्रेस ने सुरू होईल. सर्वांना विनंती आहे कि वेळेच्या २ तास आधी मुंबई सेंट्रल स्थानकावर पोहोचण्याची काळजी घ्यावी, यादरम्यान आयोजकाच्या संपर्कात रहावे, येथे सर्व यात्रेकरूंना आपापली उपस्थिती दर्शवून त्यांची आसने दाखवण्यासाठी मदत होईल. आपल्या तिकिटाप्रमाणे आसने दिलेली असतील त्याप्रमाणे बसावे, कुणालाही आपल्या सोईनुसार सिट्स मिळत नाहीत आणि ते आयोजकाच्या हातात नसते, जर तशी गरज भासल्यास संबंधित प्रवाशाने सहप्रवासी असेल त्यास विनंती करून सोयीनुसार जागा करून घ्यावी. आयोजकाकडुन उपलब्ध करून दिली जाणार नाही. यात्रेला निघण्यापूर्वी सर्वानी आपले सामान तथा प्रवासात लागणारे साहित्य, खादयपदार्थ सोबत घेणे, ज्यांना ओषधे चालू आहेत त्यांनी ती सोबत घेणे, सोबत स्वेटर अथवा कानटोपी घेणे, थंडी असल्याने त्याचा उपयोग होऊ शकतो, कोणाला काही व्याधी अथवा काही त्रास असल्यास कृपया आम्हाला याची पूर्वकल्पना द्यावी. *रेल्वे प्रवासात आणि बस प्रवासात प्रत्येकाला आपल्या खाण्यापिण्याची व्यवस्था स्वतः करावी लागेल*. रेल्वे प्रवास संपल्यानंतर सर्व यात्रेकरूंना जेवणाच्या कुपन्स दिल्या जातील. ज्यांचा उपवास असेल त्यांनी सोबत फळे अथवा उपवासाचा फराळ सोबत ठेवावा, उपवासाचे आम्ही नियोजन करत नाही आणि पॅकेज मध्ये त्याकरिता वेगळी सवलत नाही. स्वतःच्या मौल्यवान वस्तूची काळजी स्वतः घ्यावी, हरवल्यास आयोजक जबाबदार राहणार नाही. *दिवस दुसरा* दुपारी साधारणपणे ०१:३० पर्यंत आपण द्वारका स्थानकावर पोहोचणार. तेथून मग रिक्षाने हॉटेलकडे रवाना होणार. ठरल्याप्रमाणे हॅाटेलचे रुम दिले जातील. (शेअरींग किमान ४ व्यक्ती) *(वेगळी रुम हवी असल्यास त्याचे अधीकचे चार्जेस द्यावे लागतील.)* फ्रेश होऊन जवळच्या जेवण आयोजीत केलेल्या ठिकाणीच जेवणाकरीता जायचे आहे. जेवण करून मग त्यादिवशी द्वारका मंदिर आणि बिच फिरणार आहोत *दिवस तिसरा:* सकाळी ०६:३० पर्यंत आपण द्वारका येथून बसने जुनागढ कडे निघणार आहोत, वाटेत बेट द्वारका, रूक्मिणी मंदिर, नागेश्वर, भालकातिर्थ, गिता मंदिर, त्रिवेणी संगम आणि सोमनाथ मंदिर यांना भेट देणार आहोत वाटेत सकाळचा नाष्टा, दुपारचे जेवण करणार आहोत. रात्री ८-९ पर्यंत गिरनार ला नियोजित हॅाटेलवर पोहचणार, रात्रीचे जेवण करून आपापल्या रूमवर जाणार. ज्यांना पायी गुरुशिखर चढायचे आहे त्यांनी रात्री १२:३० वाजता चढायला सुरूवात करावी कारण रात्रीचे वातावरण थंड असल्याने चढणे सोईस्कर असते, चढताना सोबत जाड पाण्याच्या बाटल्या घ्याव्या. पर्यावरणाला हानी होईल अशा बाटल्या तथा पिशव्या तेथे एन्ट्री पॅाईंटवर काढून घेतल्या जातात (पूर्ण जुनागढ मध्ये प्लास्टिक बंदी आहे) याची खबरदारी घ्यावी. सोबत लिंबाच्या गोळ्या, ORS, आणि हलका खाऊ घ्यावा. सोबत पाणी जेवढ्या जास्त प्रमाणात घेता येईल तेवढे आवर्जुन घ्यावे कारण रात्री वर कुठल्याही प्रकारे पिण्याच्या पाण्याची सोय नाहीये. सोबत टॅार्च लाईट घ्याव्यात. आणि सोईनुसार पायात चपला अथवा बुट घालावेत, कारण अनवाणी पायाने गुरुशिखर चढणे धोकादायक असते. तसेच गुरुशिखर चढणार्या व्यक्तीने रात्रीच्या जेवणात हलका आहार घ्यावा कारण गुरुशिखरावर कुठल्याही प्रकारच्या नॆसर्गिक विधीची सोय नाहीये. ज्याला रोप-वे ने गुरुशिखरला जायचे आहे त्यांनी दुसर्या दिवशी सकाळी ७ वाजता रोप-वे चालू होतो त्यानुसार नियोजन करावे. (आम्ही रोप-वे चे नियोजन करत नाही) *दिवस चॊथा* पायी गुरुशिखर चढून गेल्यावर पहाटे ४ त ५ वाजेपर्यंत दत्तस्थानावर पोहोचता येते. सकाळी ६ वाजता मंदिर उघडल्यावर दर्शन घेऊन मग खाली उतरण्यास सुरूवात करायची जवळच असलेल्या प्रसादालयात (कमंडलू) प्रसाद घेउन, दत्त धुनी पाहून मग गुरुशिखरावरुन परतीचा प्रवास करायचा आहे. आंबामाता मंदिरापर्यंत पोहोचल्यावर परतीसाठी ज्यांना रोप-वे ने खाली उतरायचे असल्यास तसा पर्याय आहे. त्याचे तिकिट दर ४००/- प्रती व्यक्ती आहे, आणि ज्यांना पायी गुरुशिखर उतरायचे आहे ते पायी उतरु शकतात. रूमवर परतल्यानंतर ज्यांना जेवण करायचे आहे त्यांनी जेवण करून शक्यतो आराम करावा. त्या दिवशी आंघोळ न करण्याची आख्यायिका आहे, पण ते ऎच्छिक आहे. रूमवर आराम करून संध्याकाळी ज्यांना जवळपास फिरायचे असल्यास ते फिरुन येऊ शकतात. तसेच स्थानिक पर्यटन स्थळे व मंदिरेही आहेत ते फिरण्यासाठी रिक्षा असतात, ज्यांना फिरायची ईच्छा असेल त्यांनी स्वखर्चाने फिरुन येऊ शकतात. रात्री तिथेच हॅाटेलवर मुक्काम असेल. *दिवस पाचवा* सकाळी ठरलेल्या ठिकाणी नाष्टा करून, तसेच दुपारी जेवण करून साधारण दुपारी १२ वाजता रिक्षाने जुनागढ स्थानकाकडे रवाना. दुपारच्या १२:५८ च्या ट्रेन क्रमांक १९२१७ सॊराष्ट्र जनता एक्सप्रेस ने मुंबई कडे रवाना. *दिवस सहावा* सकाळी ०५: ०० ला सगळे बांन्द्रा टर्मिनल्स ला पोहोचणार. येथे आपली यात्रा समाप्त 🙏 *काही महत्वाच्या टिप:* • यात्रेत काही बदल झाल्यास आयोजकाकडुन कळवण्यात येईल. • रुम किमान ४ ते ५ जणांना शेअरींग बेस ने असेल. • त्याव्यतिरिक्त वेगळी रुम हवी असल्यास अधिकचे चार्जेस द्यावे लागतील. • बस प्रवासात महिलांना पुढील सिट्स दिल्या जातील. • जेवणाचा जो मेनु ( शाकाहारी थाळी) असेल त्याव्यतिरिक्त वेगळी व्यवस्था नसेल. • चहा नाष्टा सकाळी ८ ते ९ यावेळेसच उपलब्ध असेल.*(एक वेळ)* • जेवणाची दुपारची वेळ ११:३० ते २ असेल आणि रात्रीच्या जेवणाची वेळ ७:३० ते १० असेल. • रोज प्रत्येकी एक पाण्याची बाटली (रेल्वे प्रवास वगळता) देण्यात येईल. • संध्याकाळी फक्त चहा असेल.(रेल्वे प्रवास वगळता) • बुकिंग करिता रक्कम ₹५५००/- आधी भरणे बंधनकारक असेल. यात्रा रद्द केल्यास बुकिंग रक्कम कुठल्याही परिस्थितीत परत केली जाणार नाही. • नैसर्गिक कारणास्तव यात्रा रद्द झाल्यास पैसे परत होणार नाहीत, त्याबदल्यात पुढे कधीही त्या व्यक्तीस त्याच किमतीत (तिकिटाची किंमत वगळता) यात्रेस येण्याची मुभा असेल. बदली प्रवासी घेतला जाणार नाही. रेल्वेची तिकिटे पाठवल्यानंतर व्यवस्थित तपासून घ्यावीत, काही त्रुटी असल्यास लगेच कळवावे. अंतिम निर्णय हा आयोजकाचा राहिल. यात्रेदरम्यान सर्व नियमांचे व अटिंचे पालन करणे बंधनकारक असेल. आयोजकांचा मोबाईल नंबर यात्रेदरम्यान आपल्या मोबाईल मधे सेव करून ठेवावा. 9152091078/7710863217
*पिठापुरम - कुरवपूर - श्रीशैल्यम - मंत्रालय यात्रा* *समर्थ टुर्स ॲन्ड ट्रॅव्हल्स घेऊन येत आहे एक सुवर्णसंधी!* *चला श्रीपाद श्रीवल्लभ स्वामींच्या पावन भूमीचे दर्शन घेण्यासाठी!* *यात्रा तपशील* 📍 यात्रेची सुरुवात: मुंबई (कल्याण)* स्थानकावरून सुरू होईल 💰 *यात्रा शुल्क:* *₹१८५००/- प्रति व्यक्ती (3AC)* *₹१६५००/- प्रति व्यक्ती *(SL)* रेल्वे प्रवासासह मुंबई ते पिठापुरम आणि पिठापूर ते काचीगुडा पर्यंतचा प्रवास रेल्वे ने असेल, तिथून पुढे कुरवपूर - श्रीशैलम - मंत्रालय चा प्रवास क्रूझर जीप ने असेल आणि नंतर रायचूर ते मुंबई पर्यंतचा प्रवास ट्रेन ने असेल. 🔱 *मुख्य स्थलदर्शन (Highlights):* 🔹 *पिठापुरम – श्रीपाद श्रीवल्लभ स्वामी जन्मभूमी* 🔹 *कुरवपूर – श्रीपाद श्रीवल्लभ स्वामी कर्मभूमी* 🔹 *मंत्रालय – परमपूज्य श्री राघवेंद्र स्वामी मंदिर* 🔹 *अन्नावरम – श्री सत्यनारायण स्वामी मंदिर* 🔹 *मंथनगड – श्री गुरुचरित्रातील १० व्या अध्यायाचे पवित्र स्थान* 🔹 *कुक्कुटेश्वर मंदिर – पादगया क्षेत्र* 🔹 *अनघालक्ष्मी मंदिर* 🔹 *श्रीशैलम – मल्लिकार्जुन ज्योतिर्लिंग आणि छत्रपती शिवाजी महाराज मंदिर* 🍱 *यात्रा शुल्कामध्ये समाविष्ट सुविधा:* ✅ *रेल्वेचा प्रवास AC3 आणि स्लीपर कोच ने (ऐच्छिक) असेल* ✅ *रेल्वे प्रवासादरम्यान खानपान समाविष्ट नसेल* ✅ *यात्रेदरम्यान आयोजकाने नेमून दिलेल्या ठिकाणीच सकाळचा चहा-नाष्टा, दुपारचे जेवण, संध्याकाळचा चहा, आणि रात्रीचे जेवण समाविष्ट असेल, तसेच रोज एक पाण्याची बाटली देण्यात येईल* ✅ *इतर खर्च जसे की प्रवेश फी, वयक्तिक खर्च समाविष्ट नसेल* ✅ *कुरवपूर - श्रीशैल्यम - मंत्रालय हा संपूर्ण प्रवास क्रूझर जीप ने असेल (१० प्रवासी)* ✅ *राहण्याची उत्तम सोय – (एका रूममध्ये ४/३/२ व्यक्ती) वेगवेगळ्या ठिकाणानुसार शेअरिंग बेस प्रमाणे असेल* (वेगळी रुम हवी असल्यास अधिकचे चार्जेस द्यावे लागतील) ✅ *यात्रेदरम्यान कुणाचा उपवास असल्यास तशी सोय यात्रेकरुने करावी, आयोजकांकडून उपवासाचे नियोजन होणार नाही* ✅ *यात्रेच्या वेळी नेमून दिलेल्या सूचनांचे आणि अटींचे पालन यात्रेकरुने करावे, जेणेकरून प्रवास सुखकर होण्यास मदत होईल.* ✅ *संपूर्ण प्रवास हा ५ दिवसाचा असेल (रेल्वे प्रवास वगळता)* 📞 *संपर्क आणि नाव नोंदणीसाठी आजच संपर्क करा:* +91 9152091078 / 7710863214 / 7021859411
पिठापूर दत्तधाम यात्रा. ......,*दिवस पहिला* १) आपली यात्रा कल्याण स्थानकावरून ट्रेन क्रमांक १८५२० Ltt Vskp एक्सप्रेस ने सुरू होईल ट्रेन ची वेळ सकाळी ०७:३२ वाजता आहे, पण सर्वांना विनंती आहे कि वेळेच्या १ तास आधी कल्याण स्थानकावर पोहोचण्याची काळजी घ्यावी, यादरम्यान आयोजकाच्या संपर्कात रहावे, येथे सर्व यात्रेकरूंना आपापली उपस्थिती दर्शवून त्यांची आसने दाखवण्यासाठी मदत होईल. आपल्या तिकिटाप्रमाणे आसने दिलेली असतील त्याप्रमाणे बसावे, कुणालाही आपल्या सोईनुसार सिट्स मिळत नाहीत आणि ते आयोजकाच्या हातात नसते, जर तशी गरज भासल्यास संबंधित प्रवाशाने सहप्रवासी असेल त्यास विनंती करून सोयीनुसार जागा करून घ्यावी. आयोजकाकडुन उपलब्ध करून दिली जाणार नाही. २) यात्रेला निघण्यापूर्वी सर्वानी आपले सामान तथा प्रवासात लागणारे साहित्य, खादयपदार्थ सोबत घेणे, ज्यांना ओषधे चालू आहेत त्यांनी ती सोबत घेणे, सोबत स्वेटर अथवा कानटोपी घेणे, पावसाळा असल्याने गारवा जाणवतो, अशा परिस्थितीत त्याचा उपयोग होऊ शकतो, कोणाला काही व्याधी अथवा काही त्रास असल्यास कृपया आम्हाला याची पूर्वकल्पना द्यावी. ३) *रेल्वे प्रवासात आणि बस प्रवासात प्रत्येकाला आपल्या खाण्यापिण्याची व्यवस्था स्वतः करावी लागेल*. ४) रेल्वे प्रवास संपल्यानंतर सर्व यात्रेकरूंना जेवणाच्या कुपन्स दिल्या जातील. ज्यांचा उपवास असेल त्यांनी सोबत फळे अथवा उपवासाचा फराळ सोबत ठेवावा, उपवासाचे आम्ही नियोजन करत नाही आणि पॅकेज मध्ये त्याकरिता वेगळी सवलत मिळत नाही. ५) स्वतःच्या मौल्यवान वस्तूची काळजी स्वतः घ्यावी, हरवल्यास आयोजक जबाबदार राहणार नाही. *दिवस दुसरा* १) साधारणपणे सकाळी ६:५० पर्यंत आपण पिठापूरम स्थानकावर पोहोचणार. तेथून मग रिक्षा ने हॉटेलकडे रवाना होणार. साधारणपणे ७:३० वाजेपर्यंत हॉटेल वर आपण पोहोचणार. २) ठरल्याप्रमाणे हॅाटेलचे रुम दिले जातील. (शेअरींग किमान ४ ते ५ व्यक्ती) *(वेगळी रुम हवी असल्यास त्याचे अधीकचे चार्जेस द्यावे लागतील.)* ३) फ्रेश होऊन सकाळी १० वाजेपर्यंत जवळच्या आयोजीत केलेल्या ठिकाणीच नाष्टा करीता जायचे आहे. नाष्टा करून मग मंदिरात दर्शनासाठी निघायचे. ४) दर्शन झाल्यावर दुपारी मंदिरात जेवणाचा प्रसाद असतो, ज्यांना प्रसाद स्वरूपात जेवण करायचे असेल त्यांनी करावे, आणि जण प्रसाद नको असेल त्यांनी आपल्या ठरलेल्या हॉटेल मध्ये जेवण करून घ्यावे. ५) जेवण झाल्यावर लागलीच आपल्या ठरलेल्या रिक्षाने पीठापुर स्थित मंदिराना भेट द्यायची आहे. ६) संध्याकाळी हॉटेलवर परतल्यावर जेवण करून मुक्कामी. *दिवस तीसरा* १) सकाळी नाष्टा करून मग बाजार फेरी करून कुणाला खरेदी करायची असल्यास करू शकता. २) दुपारी जेवण करून मग रिक्षाने जवळच्या मंदिराना आणि काकिनाडा समुद्र किनारी भेट द्यायची आहे ३) रात्री उशिरा हॉटेलवर परतल्यानंतर रात्रीचे जेवण करून थोडा आराम करावा. ४) रात्री उशिरा ११:३० वाजता हॉटेल check-out करायचे, आणि रिक्षाने पीठापुर रेल्वे स्थानकाकडे परतीच्या प्रवासाकरिता निघायचे. *दिवस चौथा* १) मध्यरात्री १:२५ मिनिटांनी १८५१९ Vskp Ltt Express या ट्रेन ने मुंबई करिता परतीचा प्रवास सुरू होईल. *दिवस पाचवा* १) संपूर्ण दिवस प्रवासात *दिवस सहावा* १) सकाळी पहाटे ३:१० मिनिटांनी ट्रेनचा प्रवास कल्याण स्थानकावर संपेल. २) इथे यात्रा समाप्त होईल. *काही महत्वाच्या टिप:* यात काही बदल झाल्यास आयोजकाकडुन कळवण्यात येईल. रुम किमान ४ ते ५ जणांना शेअरींग बेस ने असेल. त्याव्यतिरिक्त वेगळी रुम हवी असल्यास अधिकचे चार्जेस द्यावे लागतील. जेवणाचा जो मेनु असेल त्याव्यतिरिक्त वेगळी व्यवस्था नसेल. चहा नाष्टा सकाळी ८ ते ९ यावेळेसच उपलब्ध असेल.*(एक वेळ मर्यादित)* जेवणाची दुपारची वेळ ११:३० ते २ असेल आणि रात्रीच्या जेवणाची वेळ ७:३० ते १० असेल. *(अमर्यादित)* बुकिंग करिता रक्कम ₹५५००/- आधी भरणे बंधनकारक असेल. यात्रा रद्द केल्यास बुकिंग रक्कम कुठल्याही परिस्थितीत परत केली जाणार नाही. अथवा त्याच्या बदली प्रवासी घेतला जाणार नाही. रेल्वेची तिकिटे पाठवल्यानंतर व्यवस्थित तपासून घ्यावीत, काही त्रुटी असल्यास लगेच कळवावे. अंतिम निर्णय हा आयोजकाचा राहिल. यात्रेदरम्यान सर्व नियमांचे व अटिंचे पालन करणे बंधनकारक असेल. माझा मोबाईल नंबर यात्रेदरम्यान आपल्या मोबाईल मधे सेव करून ठेवावा. 9152091078/7710863217
काश्मीर ट्रिप
Customer satisfaction is our goal.
Customer satisfaction is our goal.
Customer satisfaction is our goal.
Customer satisfaction is our goal.
Customer satisfaction is our goal.
Customer satisfaction is our goal.
Customer satisfaction is our goal.
गीता मंदिर
भालका तीर्थ
Happy Moments
गिरनार दर्शन
द्वारकाधीश मंदिर
गुरुशिखर पहिली पायरी
गुरूशिखर सर केल्यावरचा आनंद
द्वारका स्थित हॉटेल
डॉ संतोष गुरव यांचा गिरनार यात्रेसंदर्भातला आलेला अनुभव.......*गिरनार दत्तधाम यात्रा — अध्यात्मिक बायपासचा अनुभव* अध्यात्म हा माझा अभ्यासाचा विषय आजपर्यंत तरी नाही.मी नास्तिक नसलो तरी फारसा आस्तिक ही नाही.श्रद्धा आणि अंधश्रद्धा यामधला भेद मला समजतो त्यामुळे मी देवाचे अस्तित्व आहे हे मान्य करतोच,तशी श्रद्धा ही ठेवतो.परंतु कर्मकांडात मी अडकत नाही.तरीही आजअखेर तीर्थक्षेत्र मला खुणावतात,बोलावतात,सुख - समाधानाने दर्शन ही होते हीच माझ्यासाठी आनंदाची बाब आहे.नुकताच असा योग आला. माझे वडील कै.उत्तम मारुती गुरव हे दत्त भक्त होते.आयुष्याचा शेवटच्या समयी हार्ट अटॅक आल्यानंतर जेव्हा हाॅस्पिटल कडे जाण्यासाठी रिक्षात बसले तेव्हाही त्यांच्या मुखात अखंड दत्त नाम होतं त्यांच्या या पुण्याईमुळे मी माझ्या कुटुंबियांसह गिरनार दत्तधामची यात्रा पूर्ण करु शकलो.सहकुटुंब असा हा फार वर्षांनंतर प्रवास घडला.धावपळीच्या आणि स्पर्धेच्या या जगात ५० शी नंतर कुटुंब ही प्रायोरिटी लक्षात यायला लागतं.असो,आजचा विषय हा नाही.त्यावर परत कधीतरी. जुनागड च्या छोटेखानी रेल्वे स्टेशन वर उतरलो.टुर ऑपरेटर श्री तांबे यांनी मुक्कामाची छान सोय केली होती.फ्रेश होऊन साधारणतः दुपारी १ च्या सुमारास श्री क्षेत्र सोमनाथ दर्शनासाठी प्रवास सुरू झाला. गुजरात मध्ये रस्ते विकास सगळीकडे दिसतो.त्यामुळे जुनागड ते क्षेत्र सोमनाथ हा प्रवास झपाट्याने व आल्हाददायक झाला. भालका तीर्थ, सोमनाथ दर्शन करुन रात्री ९ वा परत जुनागड मुक्कामी आलो.आता वेध लागले गुरु शिखर दर्शनाचे.संकल्प केला होता अथ पासून इति पर्यंत संपूर्ण चढाई पायी करायची.उन्हाचा तडाखा सोसणार नसल्याने दिवसा शक्य नव्हते.म्हणून रात्रीच चढाई ला सुरुवात करायची हे ठरले. दिवसभराचा प्रवास झाला होता.त्यानंतर थोडासा हलका आहार घेतला आणि जमीनीवर अंग टेकले.पण झोप उडालेली.तास - दिड तासाच्या डुलकी नंतर उठलो.स्नान केले.आणि तरुण तुर्क दोन्ही भाच्यांच्या (हेमंत आणि परेश) बरोबर बरोबर १ वा .प्रथम पायरीजवळील मारुतीरायाच्या दर्शनासाठी नतमस्तक झालो.शक्ती दे, सामर्थ्य दे अशी महाबलीला प्रार्थना करीत श्रीफळ अर्पण केले.मनात आपोआप सकारात्मक उर्जा निर्माण झाली आणि अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त चा गजर करीत पहिल्या पायरीला नमस्कार केला.दत्त महाराजांचं स्मरण करीत चढाई सुरु केली. अष्टमीच्या चांदण्या रात्री,चंद्राच्या साक्षीने पायऱ्या चढताना शरीराचा कस लागत होता. श्वास वेगाने चालू लागला.वर चंद्राकडे लक्ष गेलं की हळूहळू आपण चंद्रावर पोहोचतो की काय चढाई करीत असं वाटत होतं.खडी चढण.एक चांगली बाब म्हणजे लाईट ची सोय होती.ज्या थोड्या ठिकाणी ती नव्हती तिथे चंद्रप्रकाश वाटचाल त्याहीपेक्षा जास्त सुकर करीत होता.काही सहप्रवासी होते.पण अखंड बडबडीच्या त्या गृप ना टाळत आम्ही शांततेचा ,जंगल निरवतेचा आनंद घेण्यासाठी पुढे मागे कोणी नाही अशी चाल ठेवली.त्यामुळे मन एका वेगळ्याच शांततेत बुडाले होते.फक्त वारा,रात किडे,हातातील काठीचा दगडावर होणारा आवाज आणि जोर जोरात होत असलेल्या श्वासाचा आवाज.खोलवर शांततेचं साम्राज्य.मनाशी संवाद.अधुन मधुन थोडंसं थाबलं ,श्वास नाॅर्मल झाला की बोलणं सुचायचं . याच बोलण्यातून एक वेगळीच संकल्पना जाणवली,वैद्यकीय भाषेत जसं हृदयातील ब्लॉकेज काढण्यासाठी बायपास सर्जरी केली जाते, तशी ही गुरु शिखर चढाई म्हणजे एक अध्यात्मिक बायपास होय. मानवी जीवनात काम, क्रोध, लोभ, मोह, मद आणि मत्सर हे षडरिपु जणू मनाच्या धमन्यांमध्ये साचलेले अडथळे असतात. या अडथळ्यांमुळे जीवनाची ऊर्जा अडकते. गिरनारच्या पहिल्या पायरीवर तुमचा अहंकार मारुतीरायाच्या पायाजवळ सोडून दिला तरच पुढची चढाई सुकर होते.नाहीतर भले भले घाईला येतात.दत्त महाराज कसोटीवर उतरल्या शिवाय वर घेतच नाहीत.प्रत्येक पायरीसोबत या षडरिपुंचे ब्लॉकेज हळूहळू दूर होत जातात.तुम्ही स्वतः शी संवाद करीत पुढे जात असाल तर हा बदल नक्कीच घडतो आणि जाणवतो ही. आजच्या भौतिक जगात आपण फिटनेससाठी जिम करतो, डाएट करतो, शरीर मजबूत करतो. पण गिरनारची ही यात्रा सांगून जाते की खरा फिटनेस म्हणजे शरीरासोबत मन आणि आत्म्याचीही ताकद वाढवणे.मी काही फारसा फिटनेस प्रेमी नाही किंवा रेग्युलर असा व्यायाम ही नाही, फक्त चालणं सोडलं तर.तरीही मनापासून केलेला संकल्प आणि शरणागत भाव, नामस्मरण यामुळे ही यात्रा शक्य झाली. चांदण्यांच्या प्रकाशात डोंगर चढताना घामाने शरीर ओले झाले होते, पण मनात एक वेगळीच ऊर्जा प्रवाहित होत होती. प्रत्येक पायरी जणू एक ध्यान होती, प्रत्येक श्वास जणू एक नाममंत्र होता. भौतिक जग आपल्याला वेग, स्पर्धा आणि यश शिकवते; पण अध्यात्मिक जग आपल्याला शांतता, संयम आणि स्वतःशी भेट घडवते. गोरक्ष शिखराजवळील मोकळ्या जागेत गुरुशिखराकडे पहात छानशी १५ मिनिटांची मेडिटेशन बैठक झाली.पहाटेचे ४ वाजले होते.फक्त ३ तासात एका समाधानकारक आणि ध्येय दृष्टी समोर दिसत होतं अशा टप्प्यावर पोहोचलो होतो. पहाटेच्या त्या मंद चंद्रप्रकाशात गुरु शिखर आणि पादुका मंदिर अक्षरक्ष: झळाळून दिसतं होतं.मंदिरातील लाईट चा अनोखा प्रकाश आसमंत उजळून टाकत होता.पावलांचा तिकडे खेचत होता.इथुन पुढचे अंतर पार करणं म्हणजे या तेजोमय प्रकाशाकडे खेचून नेणारी मानसिक क्रिया,शरीर आपोआप चालत रहातं. गिरनारच्या शिखरावर पोहोचल्यावर जाणवलं फिटनेस म्हणजे फक्त स्नायूंची ताकद नाही, तर श्रद्धा, संयम आणि आत्मविश्वासाची शक्ती आहे. ही यात्रा केवळ डोंगर चढण्याची नव्हती,हे फक्त ट्रेकिंग नाही.नसतं तर ती होती स्वतःला शोधण्याची… मनातील षडरिपूंवर मात करण्याची… आणि जीवनाला नव्या ऊर्जेने जगण्यासाठी लागणारी शक्ती प्राप्त करण्याची साधना. गिरनार ला जायचं ठरल्या पासून ते पोहोचेपर्यंत मनात इच्छा,अपेक्षा, वैयक्तिक, कौटुंबिक आशा अपेक्षा गुरू महाराजांना सांगाव्यात,त्या पुर्ण होतील असा आशिर्वाद मागावा असा मनोदय होता.पण चढाईच्या पहिल्या पायरी पासून प्रत्यक्ष चरण पादुकांचे दर्शन होण्याच्या क्षणापर्यंत एक एक मनोदय बाजूला पडत गेला,महाराजांनी स्वतः समोर उभं राहू दिलं ते निरपेक्ष भावनेने.(जाणतेपणे असाच अनुभव पंढरपुरात पांडुरंगाचे दर्शन घेताना एकदा आला होता.ठरवुन गेलेलो न मागता,फक्त डबडबलेल्या डोळ्यांनी त्याच्याकडे पाहत राहिलो होतो.का आलोय तेच लक्षात राहिलं नव्हतं) शेवटच्या टप्प्यात पोहोचलो.५:३० झाले होते.दर्शंन सुरु झाले नव्हते.पण त्याही वेळी दर्शनासाठी रांग होती.पायर्यांवर विसावलो.चढाई करताना न जाणवणारा थंड आणि बोचरा वारा आता शरीरातील रंध्रारंध्रात पोहचत होता.चढताना ओझं वाटणारे कपडे आता हवे होते बरोबर अशी अवस्था झाली.या परिस्थितीवर मात करण्यासाठी पुन्हा दत्त महाराजांना शरण गेलो.दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा....चं भजन मोठ्या आवाजात सुरु केलं. तोंडाला थकवा येत नाही तोपर्यंत ते सुरु ठेवलं.साथीला बरीचशी कोल्हापुरकर मंडळी होतीच,भाचे ही होते.मनानं तिकडं गुंतलो तोवर थंडी जाणवली नाही.तोंडाला कोरड पडली,पाणी ही संपलं होतं जवळचं.नाईलाजनं गप्प झालो.पुन्हा ती बोचरी हवा अंगअंगात भिनली. पुर्व दिशा आता उजळू लागली होती.अंधारावर मात करीत एक लालसर भगवी झटा नभात पसरली.मनात सुद्धा खोलवर तिचा परिणाम होत होता.ब्लाॅकेज निघाले होते.सकारात्मक ऊर्जेच्या प्रवाहाला षडरिपुंचा अडथळा जाणवत नव्हता.महाराजांनी त्या अवस्थेत नेल्यानंतरच चरण पादुकांचे दर्शन दिले.काही मागावं ही भावनाच उरली नाही.माझ्यातल्या नास्तिकाचे मस्तक शरणागत भावनेने,निरपेक्षपणे नतमस्तक झाले.फार कमी वेळ मिळाला पण डोळे आणि मन भरून दर्शन घेतलं तेवढ्या काळात.शेकडो,हजारो वर्ष अगणित लोक इथं एवढ्या वर दहा हजार पायर्या चढून,दमुन भागुन का येतं असतील दर्शनासाठी हे उमजलं होतं.लख्ख प्रकाशानं आसमंत आणि मन व्यापून गेलं.सुर्य नारायणाला साक्षी ठेवत परतीचा प्रवास सुरू केला. ता.क. :- ज्यांच्यामुळे हा योग जुळून आला ते समर्थ टुर्स आणि ट्रॅव्हल्स, बदलापूर चे श्री मुकेश तांबे,मोठा भाऊ,भाचे असले तरी आपल्या सकारात्मक अध्यात्मिक अनुभवाने मला या दर्शनासाठी यायला तयार करणारे माझे जेष्ठ बंधु सुनील गुरव,मोठा भाचा हेमंत,लहान वयात मोठे आणि चांगले विचार ठेवणारा, सातत्याने फिरस्ता असणारा फाॅर्चुन मोटर्स कराड चा संचालक परेश,दोन्ही मोठ्या भगिनी,मोठ्या वहिनी,मोठे भाऊजी आणि आमची अर्धांगिनी अशा सर्वांचे मनःपूर्वक आभार. ( शस्त्रक्रियेच्या सोपस्कारात आप्तांच्या शुभेच्छांच तुम्हांला नैतिक बळ देत असतात .😄😄 )🙏🏻🙏🏻🙏🏻 अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त 🙏🏻🙏🏻🙏🏻
सोमनाथ (ज्योतिर्लिंग) दर्शन